व्हायरस

organic
जैविक पीक संरक्षणाच्या पद्धतींमध्ये प्रत्यक्षात एखाद्या पिकांवर व्हायरसच ङ्गवारला जातो. व्हायरस म्हटल्यावर आपण दचकतो कारण व्हायरस हा पिकाला होणारा विकार आहे पण काही व्हायरस हे पिकाला हानीकारक नसतात. ते पिकांवरच्या काही अळ्यांना मात्र मारक असतात. एन.पी.व्ही. हा असाच एक व्हायरस आहे. न्यूक्लियर पॉलीहैड्रोसीस व्हायरस हे त्याचे पूर्ण नाव. हा व्हायरस पिकावरच्या अळीवर पडतो आणि तिला संपवून टाकतो. या व्हायरसची ङ्गवारणी केली की कापूस, तूर, हरभरा, सूर्यङ्गूल, वाटाणा, वांंगी, भेंडी, टोमॅटो, यावरील अळी नियंत्रणात येते. ङ्गळांवरील ङ्गळ पोखरणार्‍या अळीवरही हा व्हायरस ङ्गवारावा. तीही अळी आटोक्यात येते. विशेषत: तूर पिकावर या म्हणजे एन.पी.व्ही. व्हायरसच्या दोन ते तीन ङ्गवारण्या कराव्यात. त्यामुळे घाटे अळी नियंत्रणात येते. ही ङ्गवारणी करताना पाण्यात या व्हायरस सोबत गूळ मिसळावा. त्यामुळे मुंगळे जमा होतात आणि तेही अळ्यांचा ङ्गडशा पाडतात.

पिकावर पडणार्‍या बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी दुसर्‍या बुरशीचा वापरही केला जात असतो. काही प्रकारच्या बुरशींमुळे पिकाला मर रोग लागतो. या बुरशीला फ्यूजारियम असे म्हटले जाते. ही बुरशी मुळावाटे पिकाच्या शरीरात एखाद्या कर्करोगाच्या जंतूप्रमाणे चढते. एकदा कर्करोग झाला आणि तो परकोटीला गेला की माणसाला वाचवणे अवघड जाते तसेच या मर रोगाचे होते. त्यावर भारी औषधे मारावी लागतात. बाजारात अशी औषधे मिळतात. ती जमिनीत मारावी लागतात आणि तिथे ती मारली की बुरशी आटोक्यात येते पण त्या औषधांचा दुष्परिणाम जमिनीतल्या अशाही काही जंतूंवर होतो की जे जंतू त्या पिकाला उपयुक्त असतात. असे उपयुक्त जीवाणू मरायला लागले की जमीन नापीक होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे अशा बुरशीनाशकांच्या ऐवजी ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशक वापरले की ते फ्युजारियम या बुरशीचा नाश करते. हे बुरशीनाशक वापरण्यासाठी पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन तिला मर रोग लागण्याचीही वाट पाहण्याची गरज नाही. पिकाची पेरणी किंवा लावण करण्याआधी बियाणांनाही ते चोळले तरी चालते. ट्रायकोडर्मा ही बुरशी मुळांच्या आसपास वाढते. पिकांची मुळे काही अन्नरस शोषण करून जगतात तशी ती काही प्रकारचे अन्नद्रव्ययुक्त द्राव सोडतही असतात.

ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक ते द्राव खाऊन जगत असतात आणि फ्यूजारियम सारख्या घातक बुरशीला ते मुळाच्या जवळही येऊ देत नाहीत. तिला असे अन्न मिळाले नाही की ती बुरशी मरायला लागते आणि ट्रायकोडर्मा ही बुरशी त्याच्यावरच वाढायला लागते. हे जैविक बुरशीनाशक केवळ घातक बुरशीचाच नाश करते असे नाही तर मररोगाला कारणीभूत ठरणार्‍या इतरही अनेक घातक जीवाणूंचा बंदोबस्त करीत असतात. या उपयुक्त बुरशीनाशकाचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे ते जमिनीतला पालापाचोळा कुजवण्याचेही काम करीत असतात. अर्थात जमिनीतल्या जमिनीत कंपोष्ट खत तयार करीत असतात. म्हणजे निसर्गात पिकांना मर रोग लावणार्‍या बुरशीचा जसा जन्म झालेला आहे तसा त्या बुरशीला खाणार्‍याही बुरशीची उत्पत्ती झालेली आहे. आपण ङ्गक्त त्यांचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे. या उपकारक ठरणार्‍या ट्रायकोडर्मा या बुरशीला काही कंपन्यांनी भूसंजीवनी किंवा भूरक्षक अशीही नावे दिली आहेत.

आपल्या शेतात शेणातून हुमणी येते. तीही पिकांची मुळे कुरतडत असते. हुमणीलाही आपण औषधे मारत असतो. त्याचे अनेक वाईट परिणाम होतात. ते परिणाम टाळण्यासाठी हुमणीवरही मेटारायझीयम या जैविक बुरशीनाशकाचा वापर केला जात असतो. ही बुरशी हुमणीच्या अंगावर वाढते. ती तिच्या अंगावरचे अन्नरस शोषून घेते.त्यामुळे हुमणी मरून जाते. हुमणी ही शेणात तयार होते व वाढते. शेणखतातून ती शेतात येते. पण कंपोष्ट खत तयार करताना त्यात डीकंपोझिंग कल्चर वापरले की हुमणी मरते. त्यातल्या त्यात कंपोष्ट खत तयार करताना डिकंपोझिंग कल्चरसोबत मेटारायझीयम मिसळल्यास तर हुमणीचे प्रभावी नियंत्रण होते. आणखी काही पद्धतींची माहिती आपण घेणार आहोत. त्यातली एक पद्धत म्हणजे कामगंधक सापळे (ङ्गेरोमन ट्रॅप). कीटकांच्या दुनियेमध्ये नर-मादी संबंध असतात आणि नर कीटक मादीकडे तिच्या शरीराच्या वासावरून आकृष्ट होत असतो. मादी कोठे लपलेली आहे हे त्याला तिच्या शरीराच्या विशिष्ट वासावरून समजते. या वासाला किंवा गंधाला कामगंध असे म्हणतात. ज्याला इंग्रजीमध्ये ङ्गेरोमन असे म्हटले जाते.

प्रत्येक कीटकामध्ये मादीच्या शरीराचा हा कामगंध वेगवेगळा असतो. त्या सर्व गंधांचा आणि वासांचा अभ्यास करून प्रयोगशाळेमध्ये तशाच प्रकारचा गंध असलेली काही रसायने तयार केली जातात. ही रसायने एका काचेच्या नळीत भरून ती नळी एका प्लॅस्टिकच्या सापळ्यात ठेवली जाते. असा हा सापळा पिकात ठेवला की, त्या वासाच्या अनुरोधाने नर कीटक सापळ्याकडे आकृष्ट होतो. तो त्या काचेच्या नळीच्या आसपास घोटाळण्याचा प्रयत्न करतो. त्यातच तो सापळ्यात आडकतो आणि मरतो. या पद्धतीने तूर, वाटाणा, हरभरा या पिकांवरील घाटेअळी, कापसावरील बोंड अळी, शेंडे अळी, अमेरिकन बॉल वर्म, पिंक वर्म तसेच वांगी, भेंडी आणि टोमॅटो या वरील काही कीडींचा बंदोबस्त करण्यात यश आलेले आहे. एकदा नर असा सापळ्यात सापडून मरण पावला की, मग या कीटकांची पैदास एकदम संपून जाते. एकदा हा सापळा खरेदी केला की, तो दोन वर्षे टिकतो. परंतु कामगंध रसायन मात्र दर २० ते २५ दिवसाला बदलावे लागते. ज्या पिकांमध्ये हे कामगंध सापळे लावायची असतील त्या पिकाच्या उंचीपेक्षा एक ङ्गूट अधिक उंचीची काठी घेऊन त्या काठीला हे सापळे लावले जातात. एका एकरात किमान चार तरी सापळे लावावेत. कामगंध सापळे विविध आकारात आणि प्रकारात बाजारामध्ये उपलब्ध असतात. अशाच प्रकारच्या काही सापळ्यांना स्टिकी ट्रॅप असे म्हणतात. या सापळ्यांमध्ये कामगंधाची नळी तर असतेच परंतु सापळ्याच्या आत डिंकासारखा किंवा ङ्गेव्हिकॉलसारखा अति चिकट पदार्थ लावलेला असतो. कामगंधाच्या आकर्षणाने जे कीटक या सापळ्याकडे आकर्षित होतात ते या चिकट पदार्थाला चिटकून बसतात आणि मरतात.

अशाच प्रकारचा पण थोडा वेगळा प्रकार म्हणजे लाईट ट्रॅप. त्यामध्ये कसलेही रसायन वापरले जात नाही. आपण आपल्या घरी अनेक वेळा एक अनुभव घेत असतो. पावसाळ्याच्या काही विशिष्ट दिवसात घरातल्या ट्यूब लाईटच्या भोवती बारीक बारीक किडे घोटाळत असताना दिसतात. ते त्रासदायक वाटायला लागले की, आपण त्या ट्यूबच्या जवळ तेलामध्ये बुचकळलेला एखादा कागद लटकावला की त्या कागदाला बरेच कीडे चिटकून बसतात आणि मरतात. अशाच प्रकारे शेतातले कीडेही मारता येतात. शेतामध्ये एखादी ट्यूब लाईट किंवा दुधी बल्ब लावावा आणि त्या बल्बच्या खाली जमिनीवर एखाद्या टोपलीत घासलेट किंवा कीटकनाशकाचे पाणी ठेवावे. शेतातले कीडे त्या ट्यूब लाईटकडे किंवा दुधी बल्बकडे आकर्षिले जातात आणि बघता बघता खाली ठेवलेल्या घासलेटच्या किंवा कीटकनाशकाच्या पाण्यात पडून मरतात. या प्रयोगासाठी दुधी बल्ब मिळाला नाही तर साधा बल्ब लावावा आणि त्या बल्बच्या भोवती निम्म्या भागात पांढरा कपडा गुंडाळावा. त्याकडे कीडे आकर्षित होतात.

बरेचसे कीडे निळ्या रंगाकडे आकर्षिले जात असतात. तेव्हा आपण जो दुधी बल्ब किंवा ट्यूब लावणार आहोत त्यांना निळा कपडा गुंडाळला तर अधिक कीडे आकर्षित होतात आणि अतिशय अल्प खर्चात बर्‍याच कीड्यांचा संहार होतो. कीडींचा बंदोबस्त करण्याचे हे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये औषधाचा वापर कमीत कमी व्हावा आणि शेतकर्‍यांच्या खर्चात बचत व्हावी हा हेतू आहे. शेवटी शेती व्यवसायामध्ये उत्पादन खर्च कमीत कमी करणे हे आव्हान उभे आहे. आज आपल्याला औषधांच्या वाढत्या किंमतींनी त्रस्त करून सोडलेले आहे. त्याला पर्याय म्हणून हे जैविक कीटकनाशकाचे प्रयोग करायला काही हरकत नाही. आपल्या पूर्वजांनीही सामान्य ज्ञानाच्या आधारे काही असे प्रयोग यशस्वी केलेले आहेत. त्यांचीही माहिती गोळा करून आपण स्वत: सुद्धा असे प्रयोग यशस्वी करू शकतो.

Leave a Comment