डॉक्टरांचा संप मागे घेण्यात सरकारला यश

doctor
मुंबई – मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मॅग्मोच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे.

हा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारला मागील सहा दिवसांपासून राज्यात डॉक्टरांचा संप मागे घेण्यात यश आले आहे. सरकारी रूग्णालयातील सर्वच डॉक्टर संपावर असल्याने रूग्णांचे हाल होत होते.

अनेक ठिकाणी रूग्णांना उपचाराविना जीव गमवावा लागला आहे. सरकारी डॉक्टरांनी संप पुकारल्याने रूग्णांची खासगी रूग्णालयात गर्दी झाली होती. आता खासगी रूग्णालयातील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment