जुलैअखेर कर्मचार्‍यांना ‘नारळ’ देणार रिलायन्स कम्युनिकेशन

reliance
कोलकाता – १५००० कर्मचारी संख्या असलेल्या अनिल धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने ३७ टक्के कर्मचारी कपात करण्‍याचा निर्णय घेत जुलै अखेर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांना नारळ देणार आहे. कंपनीने हे पाऊल कॉस्ट कटिंग आणि नफा वाढवण्यासाठी उचलल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दोन थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत मोठा व्यवहार भारताची चौथ्या क्रमांकाची टेलिकॉम रिलायन्स कम्युनिकेशन्स लवकरच करणार आहे. आपला बीपीओ आउटसोर्स करणे तसेच सर्व्हिस ऑपरेशन्स शेअर करण्‍यासाठी ७०० कोटी रुपयांची डील रिलायन्स करणार आहे. या मोठ्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा हजार कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवण्‍याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यात ४५०० कर्मचारी आरकॉमच्या कॉल सेंटर ऑपरेशन्समधील असून अन्य कर्मचारी शेअर्ड सर्व्हिसेस टीमशी संबंधित आहेत.

सहा हजार कर्मचार्‍यांना आउटसोर्सिंग डील निश्चित झाल्यानंतर थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये पाठवले जाईल. बीपीओ आणि शेअर्ड सर्व्हिस बिझनेसमधून कंपनीला अपेक्षीत नफा होत नसून त्यामुळे त्याला कंपनीन आउटसोर्स करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आरकॉममध्ये १० हजारांहून कमी कर्मचारी राहणार आहेत, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

कंपनीला बीपीओ आणि शेअर्ड सर्विसेसला आउटसोर्स केल्याने सुमारे २०० कोटी रूपयांचा नफा होईल. आउटसोर्सिग आणि कर्मचारी कपात करण्‍याची जबाबदारी चीफ एक्झीक्यूटिव्ह विनोद सौने आणि यूमन रिसोर्सचे प्रमुख अमित दास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment