घरगुती हिंसेची शिकार असणार्‍या पुरूषांसाठी सिफ अॅप

sif
घरगुती हिंसेची शिकार केवळ महिलाच असतात असे नाही तर अनेक पुरूषही अशा स्वरूपाच्या हिंसाचाराला सामोरे जात असतात. या प्रकारच्या वा अन्य त्रासांना सामोरे जावे लागत असलेल्या पुरूषांसाठी इंडिया फॅमिली कौंटर संस्थेच्या कोलकाता येथील हृदय नेस्ट विभागाने सिफ नावाचे अॅप तयार केले असून त्रासाची शिकार होत असलेला कोणताही पुरूष हे अॅप वापरून मदत मिळवू शकणार आहे.

हृदय नेस्टचे महासचिव अमित गुप्ता या संबंधी माहिती देताना म्हणाले की, आम्ही हे अॅप आणल्यापासून अनेक तरूण मुलानी आमच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला आहे. ५० दिवसांत आमचेकडे १६ हजारांहून अधिक मदत मागणारे कॉल आले आहेत. आमच्या अॅपच्या सहाय्याने २५ राज्यातील ५० शहरातील ५० एनजीओंशी संपर्क साधून कायदेशीर मदत मिळविणे शक्य होते आहे. महिलांवर जसे अत्याचार होतात तसेच कांही पुरूषांनाही अशा प्रसंगाना सामोरे जावे लागत असते हे भारतात मान्य केले जात नाही. त्यामुळे आम्ही हे अॅप तयार केले आहे.

आमच्याकडे संपर्क करणार्‍यात मध्यप्रदेशातील पुरूषांची संख्या अधिक आहे असे सागूंन गुप्ता म्हणाले की भारतात दर सहा मिनिटांनी एक पुरूष आत्महत्या करतो असे आढळले आहे. त्यामागे अनेक वेळा असे अत्याचार कारणीभूत असतात. त्यांच्या मदतीसाठी हे अॅप आहे.

Leave a Comment