उडणारी प्रयोगशाळा बनविणार नासा

nasa
वॉशिंग्टन – आता जगातील पहिली उडणारी प्रयोगशाळा बनविण्याचा संकल्प अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने केला आहे. `नासा’कडून सोफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निरीक्षण शाळेत १७ टनी दुर्बीण आणि आठ टनी डायमीटर असणार आहे. हे दोन्ही मॉडीफाय केलेल्या बोईंग ७४७ जेटलायनर या विमानावर बसविले जाणार आहे. याचा वापर प्लाईंग ऑब्झर्व्हेशनरी स्टडी स्टार म्हणून केला जाणार आहे.

या प्रयोगशाळेत इन्फ्रारेड टेलिस्कोप बसविली जाणार असून त्याला स्टेरीओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ऍस्ट्रोनॉमी अर्थात सोफिया म्हणून ते ओळखले जाणार आहे. १२ तासांच्या काळात ही उडती प्रयोगशाळा ६ हजार ६२५ सागरी मैल अंतर कापणार आहे. या माध्यमातून सोफियाने जमविलेली, संकलित केलेली माहिती अन्य जमिनीवरील कोणत्याही अंतराळाशी निगडीत उपकरणांना मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोफीया ही फिरती यंत्रणा आहे. अंतराळात ती दुर्बिणीच्या माध्यमातून छायाचित्रे तर घेणारच आहे, ही दुर्बीण जर्मन ऍरोस्पेस सेंटर डीएलआरने बनविली आहे. ही यंत्रणा २०१५ पासून वापरात आणली जाणार असून तिचा वापर पुढे 20 वर्षे करता येणे शक्य होणार आहे.

Leave a Comment