जगातील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी आर्सेलर मित्तल इटलीतील लुचिनी या बड्या स्टील कंपनीची खरेदी या महिन्यात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या महिन्यात या व्यवहाराला अंतिम स्वरूप दिले जाईल असे आर्सेलर मित्तल कंपनीतील वरीष्ठांकडून सांगण्यात आले आहे.
आर्सेलर मित्तलकडून लुचिनीची खरेदी
इटलीतील दोन नंबरची लुचिनी सध्या रशियाच्या सेवरस्टलच्या मालकीची आहे. या कंपनीवर २०१२ मध्ये विशेष प्रशासन नेमले गेले आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीत युरोपातील स्टीलची मागणी २५ टक्क्यांनी घटल्याने ही कंपनी अडचणीत आली होती.या कंपनीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणार्या कर्मचार्यांची संख्या ४ हजार असून या कामगारांसहच मित्तल कंपनीची खरेदी करणार आहे.