जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-१)

pik
आंध्र प्रदेशात कापूस उत्पादक शेेतकर्‍यांत आत्महत्येचे प्रमाण खूप होते. त्यातल्या काही शेतकर्‍यांनी या समस्येचा विचार केला. आता आपल्याला या संकटातून बचाव करून घ्यायचा असेल तर रासायनिक खतांचा मारा आणि नंतर औषधांची ङ्गवारणी या चक्रातून शेतीला बाहेर काढले पाहिजे असे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तसे केेलेसुद्धा. त्याचा त्यांना ङ्गायदा झाला कारण, त्यांनी एवढी औषधे वापरायला सुरूवात केली होती की, एक एकर कापसासाठी सहा हजार रुपये खर्च यायला लागला होता. त्यांनी हा प्रकार बंद केला. गोमूत्र आणि कडूनिंबाच्या लिंबोळ्याचा अर्क वापरायल सुरूवात केली.त्यांना कापसाच्या पानावर पडणारी एक अळी दिसायला लागली. तेव्हा काही अनुभवी शेतकर्‍यांनी ती अळी तर चिमण्याच खाऊन जातात असे सांगितले. पण दरम्यान या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात विषारी औषधांचा भरपूर वापर केलेला होता आणि त्यामुळे तिथे औषधे मारल्याने मरून पडलेल्या अळ्या खाल्ल्याने चिमण्याच मरायला लागल्या होत्या. चिमण्या झाल्या तरी त्यांना मेंदू असतो. त्यांना या अळ्या आपण खाता कामा नयेत असे समजायला लागते. त्यामुळेच आपल्या शेतात चिमण्या येईनाशा झाल्या आहेत.
या शेतकर्‍यांना असा प्रश्‍न पडला की, चिमण्या तर येत नाहीत पण आल्या तर महागडी औषधे वापरण्याची गरज नाही. त्यांच्यामुळे औषधांचे पैसे वाचणार आहेत. चिमण्यांना आता या शेतात विषारी औषधे वापरली जात नाहीत हे कसे सांगणार ? त्यांना काही सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेतीतला ङ्गरक कळत नाही. त्यांना ते सांगण्याची एक युक्ती या शेतकर्‍यांनी केली. त्यांनी कापसाच्या दोन ओळींच्या मध्ये परातींमध्ये ज्वारी खायला ठेवली. तिच्या शेजारी डेर्‍याच्या वर झाकायची अडणी ठेवून तिच्यात प्यायचे पाणी ठेवले. त्या निमित्ताने चिमण्या यायला लागल्या. दाणा खा, आणि थंड पाणी पी. असा क्रम सुरू झाला आणि चिमण्यांचा वावर वाढला. एके दिवशी असे लक्षात आले की, चिमण्यांनी अळ्यांचाही ङ्गडशा पाडला आहे. या अळ्या खाऊन आपण मरत नाही हे चिमण्यांच्याही लक्षात यायला लागले. मग चिमण्या येत राहिल्या आणि त्यांना खायला आवडेल अशा अळ्यांचा तरी आपोआप, पैसे खर्च न करता ङ्गडशा पडायला लागला. औषधाचे खर्चतर वाचलेच पण औषधांचे इतर परिणामही टळले. ही झाली आंध्र प्रदेशातली कथा.

आपल्या महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा या तालुक्याच्या ठिकाणी सेंद्रीय आणि निसर्ग शेती करणारे श्री. रवि गिर्‍हाण हे आपल्या शेतात असे अनेक प्रयोग करीत असतात. ते आपल्या कोणत्याही पिकांत विशेषत: तूर आणि कापूस या दोन पिकांत मुख्य पिकाच्या आत ज्वारीचे मिश्र पीक घेतात. मिश्र पीक घेण्याची पद्धत काही आपल्यासाठी नवी नाही. बिवड व्हावा आणि एक पीक नाही आले तरी मिश्र पीक तरी यावे हा आपला मिश्र पीक घेण्यामागचा हेतू असतो. पण गिर्‍हाण हे पीक मुख्य पिकासाठीचा पीक संरक्षणाचा उपाय म्हणून घेतात. हे ज्वारीच्या पिकापासून ते उत्पन्नाची आशा करीत नाहीत. त्यामुळे अशी मिश्र पीक म्हणून घेतलेली ज्वारी काहीशी पातळ पेरली तरी चालते. ती ज्वारी निसवून तिला कणीस लागले की त्यातले दाणे खाण्यासाठी शेतात पक्षी यायला लागतात. ते पक्षी जाता जाता शेतातल्या काही अळ्याही खातात. तेवढेच आपले आयते पीक संरक्षण होते. हे मिश्र पीक ङ्गक्त शेतात पक्षी यावेत यासाठीच घेतले जाते. ज्वारी आली की पक्षी यायला लागतात. तुरीच्या पिकावर ङ्गुलांना आणि शेंंगांना अळ्यांचा त्रास होत असतो. नेमके त्याच वेळी त्या मिश्र पीक म्हणून घेतलेल्या ज्वारीत दाणे भरायला लागतात. त्यांचा आपोआप बंदोबस्त होतो. आहे की नाही ङ्गुकटचे पीक संरक्षण ?

निसर्गात काही प्राणी आणि पक्षी अन्य कीटकांना खाऊन जगत असतात. ते कीटकांचे शत्रू असतात. कीटक आपले शत्रू असतात. त्यामुळे कीटकांवर जगणारे ते पक्षी आपले मित्र ठरतात. त्यांना पाचारण केले की कीटकांचा बंदोबस्त होतो. तुरीच्या शंेंगांवर पडणारी अळी हे मुंगळ्यांचे खाद्य असते. तेव्हा मुंगळ्यांना कामाला लावले की बाजारातली महागडी औषधे आणावीच लागत नाहीत. चिमण्यांसाठी ज्वारीचे दाणे ठेवता येतात तसे मुंगळ्यांसाठी काय करता येईल ? गूळ दिसला तरी मुुंगळे आपोआप येतात. त्यांना बोलवावे लागत नाही. म्हणून तुरीवर गुळाचे पाणी ङ्गवारण्याची पद्धत आहे. काही वेळा गूळ ङ्गवारताना तो पाण्यात विरघळण्यास त्रास होतो. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी या अडचणीवर सोपा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी गुळा ऐवजी कोका कोला किंवा काही शीत पेेये वापरायला सुरूवात केली आहे. शेतामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या पिकांवर पडणार्‍या रोगकिडींचा बंदोबस्त विषारी औषधांनीच केला पाहिजे असे नाही. काही वेळा एका जीवाचा बंदोबस्त दुसर्‍या जीवाकडून करता येतो. आपल्या जुन्या शेती पद्धतीमध्ये तुरीवरच्या अळीसाठी तिच्यावर गुळाचे पाणी ङ्गवारावे, असे सांगितले जाते. यामागचा हेतू काय ? अगदी सोपे आहे. गुळ ङ्गवारला की गुळाला मुंगळे लागतात आणि शेतामध्ये अशा रितीने आलेले मुंगळेच अळ्यांचा खाऊन ङ्गडशा पाडतात.

एका जीवाकडून दुसर्‍या जीवांचा असा बंदोबस्त होतो. अगदी तारतम्याने असे शास्त्र विकसित झालेले आहे. त्याशिवाय इतरही काही अशा जैविक पीक संरक्षणाच्या पद्धती शोधून काढण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या पद्धतींचा वापर करण्यासाठी शेतामध्ये जीवजंतूंचा भरपूर वावर असण्याची गरज आहे. शेती ही एक जैविक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये अनेक प्राणी, पक्षी, कीटक, कृमी, डोळ्यांना न दिसणारे जंतू सहभागी झालेले असतात. त्यांच्या जीवनक्रमाच्या चक्रामध्ये शेती होत असते. जीवांचा हा जीवनक्रम केवळ शेतीमध्येच असतो असे नाही, तर तो सार्‍या सृष्टीमध्येच सुरू असतो. जंगलात सुद्धा याचा अनुभव येतो. जंगलांमध्ये वाघांची ङ्गार गरज असते. तसेच सिंह, लांडगे हेही प्राणी जंगलामध्ये असले पाहिजेत असे आवर्जून सांगितले जात असते.

Leave a Comment