यासिन भटकळचा निर्लज्जपणा

yasin

मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी अटकेत असलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या यासिन भटकळ याने मुंबई पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे मात्र मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्याचा मला गर्वच वाटतो, असे निर्लज्जपणे सांगितले आहे.

१३ जुलै २०११ रोजी मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भटकळला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भटकळचा साथीदार असादुल्लाह अख्तर हाही याच प्रकरणात अटकेत असून त्यानेही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.

यासिन भटकळ सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली आहे. मी जे काही केले, त्याचा मला अभिमान आहे. केलेल्या कृत्याचा मला अजिबात पश्चाताप वाटत नाही. म्हणूनच मी स्वत: याची कबुली देत असल्याचे भटकळने म्हटले आहे.

Leave a Comment