ई रिटेल व्यवसायाचा भारतातील विकास वेग प्रचंड असला तरीही भविष्यात मात्र किराणा दुकानेच अधिक फायदा देणारा व्यवसाय असेल असा अहवाल आयजीडी या आंतरराष्ट्रीय कंपनीने सादर केला आहे. विशेष म्हणजे २०२८ सालापर्यंत अमेरिकेला मागे टाकून भारत किराणा व्यवसायात पहिल्या नंबरवर असेल असा अंदाजही या संस्थेने व्यक्त केला आहे.
भारत होणार सर्वात मोठा किराणा बाजार
ई कॉमर्सची कितीही वाढ झाली तरी भविष्यात अधिक नफा कमावण्याची संधी किराणा दुकानदारांनाच अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले असून अगदी छोटी पण आधुनिक दुकाने त्यात बाजी मारतील असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.२०२८ सालापर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक असेल. त्यामुळे २०२० पर्यंतच भारतातील ग्रोसरी मार्केट ११८ टक्के वाढ नोंदवले असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. हे मार्केट या काळात ८४७.९ अब्ज डॉलर्स म्हणजे ५० लाख ९० हजार कोटींवर जाईल असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे.