पांचोली कुटुंबियांचा जियाच्या आईवर 100 कोटींचा दावा

aditya-pancholi
मुंबई : जिया खानच्या आईवर अभिनेता आदित्य पांचोलीने 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आला.

जियाच्या आईचा जियाने आत्यहत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याचे आरोप आहे. राबिया खान यांनी ट्विटवर अर्वाच्च भाषेत विधान केल्याने इंडस्ट्रीमध्ये असलेल्या आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे आदित्य पांचोली यांचे म्हणणे आहे आणि त्या विरोधातच त्यांनी राबिया खानवर 100 कोटींचा मानहानीचा दाव दाखल केला आहे.

याआधी या प्रकरणात संशयित म्हणून जियाचा बॉयफ्रेण्ड आणि आदित्य़ पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीलाही अटक करण्यात आली होती. आदित्य पांचोलीने दाखल केलेल्या या दाव्यामुळे जिया खान आत्महत्या प्रकरण आता आणखी नवीन वळण घेणार आहे.

Leave a Comment