विविध भाषांत कुराण वाचणारे पेन बाजारात

quran
बरेली- बरेलीच्या बाजारात सध्या एक इलेक्ट्रोनिक पेन फारच हिट झाले आहे. हे पेन मुस्लीमांचा पवित्र ग्रंथ कुराण १२ विविध भाषांत वाचू शकते. सध्या मुस्लीम बांधवांचा रमझान हा पवित्र महिना सुरू आहे आणि या काळात कुराणाचे पठण अवश्य केले जाते. मात्र अनेकांना त्यातही तरूण पिढीला अरेबिक आणि पर्शियन भाषा फारशा अवगत नसल्याने इच्छा असूनही ते कुराण पठण करू शकत नाहीत. मात्र या नव्या पेनमुळे आता ते कुराण पठण करू शकणार आहेत.

पहिल्यांदाच अशा प्रकारचे पोर्टेबल डिजिटल कुराण कीट ई पेन बाजारात आणले गेले आहे. त्याला इअरफोनही दिले गेले असून त्याची किंमत आहे ३५०० रूपये. या इलेक्ट्रोनिक पेनवर विविध भाषांसाठी रंग आहेत. ज्या भाषेतून कुराण वाचायचे आहे त्या रंगाचे बटन दाबले की हव्या त्या पानापासून कुराण वाचता येणार आहे. इंग्रजी, मराठी, उर्दू, तमीळ अशा विविध १२ भाषा त्यात उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. रिडर फ्रेडली असे हे पेन मुस्लीम बांधवांना अतिशय उपयुक्त ठरते आहे असे दुकानदारांचे म्हणणे आहे.

Leave a Comment