विद्यार्थ्यांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

student
नवी दिल्ली – लोक संख्येच्याबाबतीत चीनपाठोपाठ भारत दुसर्‍या क्रमांकावर असतानाच आता विद्यार्थ्यांच्या संख्येतही भारताने जगात दुसरे स्थान मिळविले आहे. अमेरिकेमध्ये सध्या ३१ कोटी ५३ लाख विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संदर्भात अमेरिका अग्रस्थानी आहे.त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे, सद्यस्थितीत भारतात एकूण ३१ कोटी ५0 लाख एवढे विद्यार्थी आहेत. युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार भारत दुसर्या क्रमांकावर आहे.

जास्त वय असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघा एक टक्का आहे. या व्यतिरिक्त 0 ते ४ या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ही एक कोटी ५0 हजार एवढी आहे. यावरून हे सिद्ध होते की, पालक आपल्या विद्यार्थ्यांना कमी वयातच शाळेमध्ये प्रवेश घेऊन देतात. भारतात 0 ते ४ या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल ११ कोटी २0 लाख एवढी आहे. हे प्रमाण मात्र अविश्‍वसनीय आहे. याचाच अर्थ असा की, भारतात १0 टक्के एवढय़ा अंगणवाड्या आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू असा की, ९0 लाख ५0 हजार विद्यार्थी हे शिक्षण आणि नोकरी हे दोन्ही कार्य एकाच वेळी करत आहेत. यात ६0 टक्के विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थिनी आहेत.दुसरीकडे, भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत चीन मात्र बराच पिछाडीवर आहे.

Leave a Comment