लग्नाची मागणी घालणाऱ्या डॅनियलला भेटला विराट !

virat
लंडन – ट्विटरवरून थेट लग्नाची मागणी घालणाऱ्या डॅनियल वेटची अखेर भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने भेट घेतली आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची डॅनियल वेट ही ऑल राऊंडर खेळाडू आहे.

सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघ आहे. इंग्लंडमधील नेडबर्शियार संघासोबत भारताचा सराव सामना झाला. या दरम्यान विराटने डॅनियल वेटची भेट घेऊन फोटोसेशन केले.

हे फोटो दुसरे–तिसरे कोणी नाही, तर डॅनियलचा भाऊ मॅक्स वेट याने क्लिक केले. त्यानंतर मॅक्सनेच हे फोटो ट्विटरवर अपलोड करत त्याने या फोटोला ‘दिस वुड मेक अ क्यूट कपल…हाहाहा.’ असे कॅप्शन देखील दिले.

सध्या खराब फॉर्ममुळे 23 वर्षीय डॅनियल वेट इंग्लंड टीममधून बाहेर आहे. डॅनियलने इंग्लंडकडून 32 वन डे आणि 50 टी 20 सामने खेळले आहेत.

Leave a Comment