रेल्वे हमालांच्याही हमालीत वाढ

coolie
मुंबई – रेल्वे प्रवाशांच्या सामानाचा भार हलका करणाऱ्या परवाना धारक हमालांच्या हमाली दरात ही वाढ झाली आहे. हमालीच्या दरात सामानाच्या वजनानुसार वाढ झाली असून, रेल्वे मंत्रालयाने त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने हे दर १0 ते २0 रुपयांपर्यंत वाढवल्याचे सांगितले.

मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या टर्मिनसवर आणि पश्चिम रेल्वेच्या टर्मिनसवर परवानाधारक हमाल आहेत. प्रवाशांना त्यांना ठरलेल्या दराप्रमाणे शुल्क द्यावे लागतात. मात्र रेल्वेकडून त्यांची हमाली वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेकडून दर दोन वर्षांनी या दरात बदल करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जातो.

यंदा सामानाच्या प्रकारानुसार हमालीत १0 ते २0 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ट्रिपमागे पूर्वी प्रवाशांना परवानाधारक हमालांना ३५ रुपये मोजावे लागत होते. पण आता ४0 रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर ए-१, बी तसेच सी श्रेणीच्या स्थानकांसाठी असतील. तर अन्य स्थानकांसाठी आताचे दर ३५ रुपये होतील. यापूर्वी अन्य छोट्या स्थानकांसाठी हेच दर २५ रुपये एवढे होते. दादर स्थानकात उतरल्यावर पश्चिम रेल्वेवरुन मध्य रेल्वे स्थानकाकडे किंवा मध्य रेल्वे स्थानकातून पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी हमालाचे शुल्क ४0 रुपये असेल.

Leave a Comment