भ्रष्टाचाराचा आरोप होताच जपानी मंत्र्यांनी भोकाड पसरले

rutaro
टोकियो – भारतात काय वा जगाच्या अन्य देशात काय राजकारणी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप सततच होत असतात. हे नेते या आरोपांना इतके निर्ढावलेले असतात की कितीही आरोप झाले तरी त्यांच्यावर त्याचा कांहीच परिणाम होत नाही. त्याबाबतही हे नेते अगदी गेंड्याच्या कातडीचे असतात म्हणा किंवा असल्या आरोपांना त्यांचे कान ऐकत नाहीत असेही म्हणता येते.

जपान मात्र याला अपवाद ठरला आहे. जपानच्या रूतारो नानोमुरा या मंत्र्यांना त्यांनी सार्वजनिक निधीचा दुरूपयोग केल्याच्या आरोपावरून मिडीयाने प्रश्न विचारले तेव्हा हे मंत्री अगोदर घाबरले आणि नंतर त्यांनी चक्क भोकाडच पसरले. आरोप होताच गळा काढणार्‍या या मंत्र्यांचा व्हिडीओ सोशल नेटवर्क साईटवर लगोलग प्रसिद्ध झाला.

जपानमध्ये आपापल्या मतदारसंघात दौरा काढण्यासाठी मंत्र्यांना ५ हजार डॉलर्स खर्च करण्याची परवानगी आहे. नोनोमुरा यांनी ३० हजार डॉलर्स या कारणासाठी खर्च केले व त्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला. त्यासंबंधी पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते. तेव्हा त्यांना आरोप एकून रडे आवरेनाच. नानोमुरा यांनी या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप अजून सिद्ध झालेला नाही असेही समजते.

Leave a Comment