खुशखबर ,पासपोर्टसाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन नाही !

passport
मुंबई – भारतीय नागरिकांसाठी आता पारपत्र (पासपोर्ट) वितरण व्यवस्था जलद आणि सुलभ होणार आहे. पासपोर्ट नुतनीकरणासाठी पोलिस चौकशीची आवश्यकता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील मुख्य पासपोर्ट अधिका-यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.

मुंबईत पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज सादर करताना अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. मुलाखत, पोलिसांचा दाखला आदी किचकट प्रसंगाना तोंड द्यावे लागत असे. हे दिव्य पार केल्यानंतरही पासपोर्ट वेळेत मिळेल याची खात्री नसते. मात्र आता पासपोर्ट नुतनीकरणासाठी पोलिस चौकशीची आवश्यकता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील मुख्य पासपोर्ट अधिका-यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे. यामुळे आता पासपोर्ट नुतनीकरण करणे सुलभ होणार आहे.नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध करण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया आणि विभागीय पासपोर्ट अधिकारी टी. डी. शर्मा यांनी पासपोर्टसाठी पोलिस चौकशी करण्याचा नवा आराखडा अमलात आणण्याचे ठरवले आहे. पोलिस चौकशीला विलंब लागत असल्याने पासपोर्ट मिळण्यास उशीर होतो, अशा तक्रारी आल्या होत्या. यावर योग्य विचार केल्यानंतर आता नविन आराखड्यानुसार सात दिवसात पोलिस चौकशी करुन प्रमाणपत्र देण्यात य़ेईल, असे मारीया यांनी सांगितले.तर अल्पवयीन, शासकीय नोकर आणि जेष्ठ नागरीकांना पोलिस चौकशी न करता थेट पासपोर्ट देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी सांगितले.

Leave a Comment