विम्बल्डनच्या फायनलमध्ये क्विटोवा आणि बॉकार्डमध्ये लढत

wimbloden
लंडन- सहावी सीडेड चेक रिपब्लिकची पेट्रा क्विटोवा आणि १३वी सीडेड कॅनडाची युगेनी बॉकार्ड यांच्यात विम्बल्डन महिला एकेरीची अंतिम लढत उद्या होईल. प्रथमच ग्रँडस्लॅमच्या ‘फायनल’मध्ये प्रवेश करताना उपांत्य फेरीत तिसरी सीडेड रोमानियाची सिमोना हॅलेपवर ७-६(७/५), ६-२ २० वर्षीय बॉकार्डने सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

अन्य लढतीत क्विटोवाने तिच्याच देशाच्या २३व्या सीडेड ल्युसी सॅफारोवाला ७-६(८/६), ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभव केला. २०११ मध्ये जेतेपद पटकावलेल्या क्विटोवाला मागील दोन खेपेस उपांत्यपूर्व फेरीतच बाहेरचा रस्ता धरावा लागला होता.

Leave a Comment