लोकसेवा आयोगाच्या परीक्षा

lokseva
केंद्र सरकार दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक परीक्षा घेते आणि त्यातून सनदी अधिकार्‍यांच्या जागा भरते. तीन प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. आय.ए.एस. म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आय.एङ्ग.एस. (इंडियन ङ्गॉरेन सर्व्हिसेस) आणि आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिसेस). भारतात पूर्वी या परीक्षांना ङ्गार महत्व होते, कारण त्यातून देश चालवणारे सरकारी अधिकारी तयार होत असत आणि त्यांना चांगले पगार मिळत असत. आता कार्पोरेट जगतामध्ये सनदी अधिकार्‍यापेक्षा किती तरी जास्त पगार असल्यामुळे सनदी अधिकार्‍यांच्या नेमणुकांसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये तुलनेने कमी स्पर्धा होत आहे. त्यामुळे युवक युवतींनी या परीक्षांकडे वळायला काही हरकत नाही. त्यातली आय.ए.एस.ची परीक्षा सर्वात महत्वाची मानली जाते. कारण त्यातून बाहेर पडलेले विद्यार्थी प्रशासनाचा कणा होत असतात. आय.ए.एस.ची परीक्षा तीन स्तरावर होत असते. १) प्रिलिमिनरी २) मेन एक्झामिनेशन आणि ३) मुलाखत. प्रिलिमिनरी एक्झा-मिनेशनमध्ये दोन पेपर्स असतात.

त्यातल्या पहिल्या पेपरमध्ये विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबाबत आणि होणार्‍या बदलांबाबत किती जागरूक आहे हे पाहिले जाते. प्रिलीमच्या दुसर्‍या पेपरमध्ये विद्यार्थ्याचे संवाद कौशल्य, तर्कशुद्ध विचार पद्धती, निर्णय क्षमता आणि ऍप्लिकेशन ऑङ्ग माईंड ही कौशल्ये तपासली जातात. प्रिलीममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मेन्स्साठी म्हणजे लेखी परीक्षेसाठी पाचारण केले जाते. ही विद्यार्थ्याच्या सखोल ज्ञानाची खरी परीक्षा असते. ज्ञानाबरोबरच लेखन कौशल्यही तपासले जाते. या स्तरावरील परीक्षेत नऊ पेपर्स असतात. त्यातले दोन पात्रतेसंबंधीचे तर सात पेपर्स स्पर्धेसाठीचे असतात. या सात पेपरांमध्ये चार पेपर्स हे ऐच्छिक विषयांचे असतात. दोन ऐच्छिक विषय निवडावे लागतात. सरकारने त्यासाठी २६ विषय निश्‍चित केेलेले आहेत, त्यातले दोन निवडले जातात. या परीक्षेतून निवड झाल्यानंतर सर्वात महत्वाची परीक्षा म्हणजे मुलाखत. या मुलाखतीमध्ये एखादा उमेदवार चांगला प्रशासक होण्यासाठी योग्य आहे का नाही याची कसून तपासणी केली जाते. या मुलाखतीमध्ये विचारांची स्पष्टता, अभिव्यक्ती, आकलन शक्ती, समतोल निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व कुशलता यांचा कस लागत असतो. अशा या तीन पायर्‍यांमधून भारताचे सरकारी प्रशासक निवडले जात असतात.

Leave a Comment