पेस-स्टेपानेक पुरुष दुहेरीच्या उपांत्यफेरीत

leander
लंडन – विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यफेरीत दुहेरीतील भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा झेक जोडीदार राडेक स्टेपानेकने तीस-या सीडेड नेनाद झिमॉनजीस आणि डॅनियल नेस्टरच्या जोडीचा पराभव करत धडक मारली.

पेस-स्टेपानेक जोडीने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नेनाद-डॅनियल जोडीवर ३-६, ७-६ (७-५), ६-३, ६-४ असा विजय मिळवला. चार सेटपर्यंत रंगलेला हा सामना जवळपास अडीचतास सुरु होता.

पेस-स्टेपानेक जोडीला यंदाचे वर्ष फारसे चांगले गेलेले नाही. स्पर्धेत पेस-स्टेपानेक जोडीला खालचे सीडींग मिळाल्याने विजयासाठी नेनाद-डॅनियल जोडीला
पंसती दिली जात होती. मात्र या सामन्यात दोघांनी परस्परांच्या चुका सावरुन घेत एकदिलाने खेळ केला आणि वरचे सीडींग असलेल्या नेनाद-डॅनियल जोडीला पराभूत केले.

पेस-स्टेपानेक जोडीला पाचवे तर, नेनाद-डॅनियल जोडीला तीसरे सीडींग मिळाले होते. या संपूर्ण सामन्यात पेस-स्टेपानेकला कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला. शुक्रवारी उपांत्यफेरीत पेस-स्टेपानेक समोर कॅनडाच्या वासेक पॉसपीसील आणि अमेरिकेच्या जॅक सॉकचे आव्हान आहे.

Leave a Comment