रिओ दी जानेरो- प्रशिक्षक जोकीम लू यांनी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या जर्मन संघातील सात खेळाडूंमध्ये ‘फ्लू’ची लक्षणे जाणवत असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यात मॅट हमेल्स, म्युलर आदी ‘स्टार’ फुटबॉलपटूंचा समावेश आहे.
जर्मन खेळाडूंमध्ये ‘फ्लू’ची लक्षणे
ब्राझीलमध्ये देशांतर्गत प्रवासा दरम्यान सतत बदलणा-या तापमानाशी दोन हात करण्याचे आव्हान तसेच वातानुकुलित सुविधा (एसी) आणि प्रवास आदी कारणांचा फुटबॉलपटूंवर परिणाम होत असल्याचे लू यांनी म्हटले. मात्र ‘फ्लू’च्या लक्षणांनंतरही संबंधित फुटबॉलपटू फ्रान्सविरुद्ध खेळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.