जगातील एकमेव गुहा, जिच्या खोलीचा शोध अजूनही सुरूच

guha
जॉर्जिया – जगात एकमेव असलेली गुहा आहे, जिची खोली किती आहे याचा अजूनही शोध लागलेला नाही, आतापर्यंत घेण्यात आलेल्या शोधात शास्त्रज्ञांना गुहेची खोली वाढत असल्याचे आढळून आले आहे.

जॉर्जियाच्या अब्खजिया प्रांतातील घागरा डोंगररांगामध्ये ‘वोरोन्या’ नावाची जगातील सर्वात खोल गुहा आहे. या गुहेच्या दोन शाखा असून एक १३00 मीटर, तर दुसरी २१९६ मीटर खोल आहे. गुहेच्या दुसर्‍या शाखेत आणखी छोट्याछोट्या शाखा आहेत. ‘क्रुबर’ या आणखी एका नावाने ओखळल्या जाणार्‍या या गुहेबाबत जगभरातील शास्त्रज्ञ अजूनही अध्ययन करत आहेत. या गुहेत सर्वप्रथम १९६0मध्ये जॉर्जियातील संशोधक गेले होते. गुहेमध्ये ते ९५ मीटर खोलवर उतरले होते. त्यानंतर दुसरा चमू १९६८मध्ये तिथे गेला होता. त्यानंतर शास्त्रज्ञांची वेगवेगळी पथके वेळोवेळी या गुहेमध्ये अध्ययनासाठी जाताहेत. प्रत्येकवेळी गुहेच्या खोलीसंबंधी नवनवीन माहिती समोर येत असते. २00१मध्ये रशिया आणि युक्रेनच्या चमूने या गुहेची खोली १७१0 मीटर असल्याचे मोजले होते. त्यानंतर २00४मध्ये तीन शास्त्रज्ञांच्या चमूला ही गुहा आणखी खोल असल्याचे आढळून आले. त्यावेळी ही गुहा २ हजार मीटरचा आकडा पार करून गेली आहे. गुहांच्या अध्ययनाच्या इतिहासात अशी गुहा प्रथमच आढळून आली आहे. २00५ व २00६मध्ये झालेल्या अध्ययनातही वेगळी आकडेवारी पुढे आली.२00७मधील अध्ययनात जो निष्कर्ष समोर आला, तो तर आणखी चक्रावणारा होता. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ही गुहा २१९१ ते २१९७ मीटरदरम्यान खोल असण्याची पुष्टी करण्यात आली. २00 मीटर आत शिरल्यावर ही गुहा दोन भागात विभागली जाते व पुढे तिला आणखी छोट्या शाखा फुटतात. अजूनही खोलीबाबत शोध सुरूच आहे.

Leave a Comment