नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने प्रशंसा केली व कॅलिस हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर दुसरा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. कॅलिस खरोखरच काही विक्रम मोडून धावा करेल. माझ्या मते, तेंडुलकरच्या विक्रमी धावांचा पाठलाग करणार्यांमध्ये कॅलिस हा दुसर्या क्रमांकावर आहे. ३८ वर्षांचा कॅलिस सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी श्रीलंकेत आहे.
कॅलिस हा दुसरा सर्वोत्कृष्ट खेळाडू – द्रविड
कॅलिस दबावात असतानाही, तंदुरुस्त आहे. त्याची फलंदाजी आणि गोलंदाजीकडे बघता त्याला जास्त दुखापत झाली नसल्याचे जाणवते. तो अजून काही वर्षे क्रिकेट खेळू शकतो, याकडे द्रविडने लक्ष वेधले.
द्रविडच्या मते, कसोटीत १३,२८९ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११, ५७४ धावा कॅलिसच्या नावावर आहेत.यातूनच त्याची कामगिरी उत्तम असल्याचे स्पष्ट दिसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिनचे कसोटीत १५,९२१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,३२४ धावा आहेत. सचिनच्या या धावा म्हणजे कसोटीत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असलेले धावांचे विक्रम आहेत. द्रविडने कॅलिसच्या फलंदाजीची देखील प्रशंसा केली.