इंग्लंड संघात बेन स्टोक्सचे पुनरागमन

ben
लंडन – इंग्लंड क्रिकेट संघात भारताविरूद्धच्या मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला स्थान देण्यात आले आहे.

इंग्लिश निवडकर्त्यांनी ऍलेस्टर कुकच्या नेतृत्त्वाखालील ९ जुलैपासून ट्रेंटब्रिजमध्ये सुरू होणार्‍या कसोटी सामन्यांसाठी १३ सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा केली आहे. बेन स्टोक्सचे या संघात पुनरागमन झाले आहे.

मागीलवर्षी ऍडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी कारकीर्दीला २३ वर्षाच्या स्टोक्सने सुरुवात केली होती. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे स्टोक्स वेस्टइंडीज दौर्‍यासाठी संघात स्थान मिळवू शकला नव्हता. तसेच तो बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० विश्‍वचषकात आणि श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील खेळू शकला नव्हता.

स्टोक्स आता दुखापतीतून सावरला असल्याने त्याला भारताविरूद्धच्या मालिकेसाठी संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ-ऍलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स ऍण्डरसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, मॅट प्रॉयर, सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स.