सॅमसंग गॅलेक्सी एस ५ मिनी सादर

galaxy
आपल्या टॉप स्मार्टफोनची सारी वैशिष्ठ्ये छोट्या आकाराच्या स्मार्टफोन मध्ये आणलेल्या सॅमसंग ने त्यांचा गॅलेक्सी एस फाईव्ह मिनी सादर केला आहे. या स्मार्टफोनलाही फिंगरप्रिंट सेन्सर, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड, हार्ट मॉनिटर, अशा सॅमसंग गॅलॅक्सी एस पाच मध्ये असलेल्या सर्व सुविधा दिल्या गेल्या असून हा फोन पाणी आणि धूळ प्रतिबंधक आहे. शिवाय त्याला मायक्रो यूएसबीची सुविधाही दिली गेली आहे.

ग्लोबल रिलिजनंतर या महिन्याच्या अखेरी मिनी रशियात सादर केला जाणार आहे. मात्र कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. चारकोल ब्लाक, शिमरी व्हाईट, इलेक्ट्रीक ब्ल्यू आणि कॉपर गोल्ड अशा चार रंगात तो उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनला ४.५ इंचाचा स्क्रीन, ८ एमपीचा बॅक व २.१ एमपीचा फ्रंट कॅमेरा, एलइडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. टूजी, थ्रीजी, ४जी, वायफाय, ब्ल्यू टूथ ४.० कनेक्टीव्हीटी असलेल्या या फोनला अँड्राईट किटकॅट ४.४ ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या फोनचे वजन १२० ग्रॅम असून त्याची जाडी ९.१ मिलिमीटर इतकी आहे.

Leave a Comment