सुंदर बेट,पण विषारी सापांची दहशत; दंशानंतर त्वचाच गळते !

bet
साऊ पोलो – सुंदर बेट असूनही तिथे कुणीच जात नाही ,आणि गेले कि परतही नाहीत ,कारण काय तर विषारी सापांची दहशत आहे,धोकादायक बाब म्हणजे साप चावल्यानंतर प्राणी असो मनुष्य, शरीराची त्वचाच गळू लागते.

ब्राझीलच्या साऊ पोलोच्या समुद्रकिनार्‍यापासून ३२ किलोमीटर अंतरावर इल्हा डी क्वेमादा ग्रँड नावाचे एक बेट आहे. या बेटाला निसर्गसौंदर्याचे एवढे वरदान लाभले आहे की, पाहताच कुणीही त्याकडे आकर्षित होईल. मात्र हे बेट जेवढे सुंदर आहे, तेवढेच खतरनाकसुद्धा. इल्हा डी क्वेमादा ग्रँड बेटाची खासियत म्हणजे तिथे वावरणारे जगातील सगळ्यात भयंकर साप. या बेटावर गोल्डन लँसहेड व्हायपर नावाचा भूतलावरील सर्वात विषारी साप राहतो. हा साप एवढा विषारी आहे की, त्याच्या दंशाच्या भीतीमुळे लोक या बेटाकडे चुकूनही फिरकत नाहीत. गोल्डन लँसहेड व्हायपर साप संपूर्ण जगामध्ये फक्त या बेटावर आढळून येतो. या सापाचे डोके नावाप्रमाणेच टोकदार असते व त्याची लांबी सरासरी २८ इंच असते. गोल्डन लँसहेड व्हायपरची या सगळ्यांपेक्षा खतरनाक गोष्ट म्हणजे तो आपल्या शिकारीला अतिशय कडकडून चावा घेतो. त्यानंतर काही वेळातच संबंधित प्राण्याची त्वचा आपोआप गळू लागते. असे होताच हा साप आपल्या शिकारीला सहज गिळून टाकतो. अवघे ४६३0 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ही जागा एवढी खतरनाक आहे की, आजही तिथे या प्रजातीचे साप हजारोंच्या संख्येने आहेत. ब्राझील सरकारने या बेटावर सोडा, त्याच्या आसपास जाण्यासही पर्यटकांना मज्जाव केला आहे. पर्यटकच काय, कुणालाही त्यावर जाण्याची मुभा नाही. खतरनाक सापांचे साम्राज्य असलेले हे बेट स्नेक आयलंड म्हणूनही ओळखले जाते.

Leave a Comment