सिक्कांना मिळणार ५०.८ लाख डॉलर्सचे पॅकेज

sikka
इन्फोसिसचे प्रमुख म्हणून नेमणूक झालेले विशाल सिक्का यांना कंपनी ५०.८ लाख डॉलर्स इतका वार्षिक पगार देणार आहे शिवाय २० लाख डॉलर्स किमतीचे कंपनीचे शेअरही त्यांना दिले जाणार आहेत असे इन्फोसिसने काढलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सिक्का यांचे एकूण काँपेन्सेशन ७०.८ लाख डॉलर्स इतके असणार आहे.

सिक्का कंपनीचे सध्याचे प्रमुख एस.डी. शिबुलाल यांच्याकडून १ ऑगस्ट रोजी कंपनीची सूत्रे हाती घेणार आहेत. ४७ वर्षीय सिक्का यांनी जर्मन सॅपमध्ये कार्यकारी डायरेक्टर म्हणून काम केले आहे. कंपनीच्या जुलै ३० रोजी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकतक सिक्का यांच्या नेमणुकीला अधिकृत मान्यता दिली जाणार आहे. ही बैठक बंगलोर येथे होत आहे.

सिक्का यांना इन्फोसिसने भरघोस पॅकेज दिले असले तरी जगभरातील सॉफटवेअर कंपन्यांच्या तुलनेत ते कमीच आहे. इन्फोसिस ही भारतातील दोन नंबरची सॉफटवेअर सेवा देणारी कंपनी आहे. मायक्रोसॉफट कंपनीच्या सीईओचा पगार १.८० कोटी डॉलर्स इतका आहे तर आयबीएम प्रमुखाला १.६२ कोटी, सिटीबँक सीईओला १.४४ कोटी डॉलर्सचे पॅकेज आहे.

Leave a Comment