सायना जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप

saina
नवी दिल्ली – भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज जिंकल्यानंतर तिच्या जागतिक क्रमवारीतील सुधारणा झाली आहे. सायनाने या क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.

तर दुसरीकडे पी.व्ही सिंधूने याच स्पर्धेत केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे तिच्या क्रमवारीत घसरण होत ती अकराव्या स्थानावर पोहोचली आहे.

चीनच्या ली झ्युरेयी, शिक्सियन वँग आणि यिहान वँग महिला एकेरीतील क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर आहेत. दक्षिण कोरियाची जी ह्यूयान सुंग चौथ्या आणि थायलंडची रत्चनोक इंतनोन पाचव्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीत पी कश्यप २१ व्या स्थानावर आहे तर ली चोंग वेईने या क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

Leave a Comment