लग्नसंस्कृतीची अनोखी परंपरा, लग्नाआधी वधूचे अपहरण !

kidnnaping
रोम : जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या भागांमध्ये विवाहाच्या अनोख्या व विचित्र परंपरा पाहण्यास मिळतात. कुठे प्राण्यांसोबत लहान मुलांची लग्नगाठ बांधली जाते, तर कुठे भरपूर पाऊस होण्यासाठी दोन बेडकाचा विवाह लावून दिला जातो. विवाहाची अशीच एक आगळी परंपरा इटलीमध्ये पाळली जाते. तिथे लग्न होण्याआधी चक्क नवरीचेच अपहरण केले जाते. रोममध्ये प्राचीन काळापासून ही परंपरा पाळली जात असून त्यानुसार, लग्नाच्या आदल्या रात्री नवरीला नवरदेव व वर्‍हाडी मंडळीच्या नाकावर टिच्चून पळवून नेले जाते. अर्थात हे अपहरण लुटूपुटूचे व बनावट असते. अपहरणानंतर काही वेळाने एका ठरावीक ठिकाणी वधू व वर यांची भेट घडवून आणली जाते. बुकारेस्ट शहर व त्याच्या आसपासच्या भागामध्ये दर शनिवारी या परंपरेचे पालन होत असते. एकीकडे लग्नाची मेजवानी सुरू असताना दुसरीकडे नवरीचे मित्र येऊन तिला अपहरण करून पळवून नेतात. त्यानंतर तिला एखाद्या पर्यटनस्थळी ओलीस ठेवले जाते. तिथे ती रागावते, नृत्य करते आणि कॅमेर्‍यासमोर फोटोसाठी पोजही देते. या अपहरणानंतर खंडणी म्हणून तिचे मित्र व्हिस्कीची मागणी करतात आणि वधूकडून आपल्या पतीवर आयुष्यभर प्रेम करण्याचे वचन घेतात. हे सगळे फोनवरच होत असते.

Leave a Comment