भारत विकत घेणार हारपून क्षेपणास्त्र

indo-america
वॉशिंग्टन – अमेरिकेबरोबर संरक्षण भागीदारी वाढवण्यावर भारताने भर दिला असून, अमेरिकेकडून अत्याधुनिक हारपून क्षेपणास्त्रे भारत विकत घेणार आहे. भारताबरोबर होणा-या या व्यवहाराची अमेरिकन काँग्रेसला अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने माहिती दिली आहे.

भारताला २० पेक्षा जास्त जहाजविरोधी हारपून क्षेपणास्त्र विकणार असून, हा एकूण व्यवहार २०० दशलक्ष डॉलरचा असल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे.
भारत-अमेरिका लष्करी संबंध या व्यवहारामुळे अधिक बळकट होतील तसेच अमेरिकेचा महत्वाचा सहकारी असलेल्या भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होईल असे पेंटागॉनने आपल्या विक्रीच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे.

ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या शिशुमार वर्गाच्या पाणबुडीवर बसवली जातील. त्यामुळे भारतीय नौदलाच्या सागरी संरक्षण क्षमतेत अधिक वाढ होईल. भारताने यापूर्वीच जॅग्वार आणि पी-आठ आय या टेहळणी विमानासाठी हारपून क्षेपणास्त्रे विकत घेतली आहेत.

Leave a Comment