नक्षलवाद;आत्मसमर्पण योजनेत लवकरच आमुलाग्र बदल

r-r-patil
गडचिरोली – वाट चुकलेले नक्षलवादी लोकशाहीवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे येण्यास तयार असतील तर शासन सुडाने वागण्याची भुमिका घेणार नाही अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली

ते म्हणाले, आम्ही म्हणजे सरकार दोन पाऊल पुढे टाकण्यास तत्पर आहे . आत्मसमर्पित योजनेत नक्कीच उणिवा आहेत, त्या उणिवा दूर करण्यासाठी येत्या १५ दिवसात आत्मसमर्पण धोरणात आमुलाग्र बदल करुन सर्वसमावेशक व आत्मसमर्पितांचा सर्वांगिण विकास करणारी योजना तयार केली जाईल, असा विश्वासही आर.आर. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी नक्षल हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या

मुलांच्या शिक्षणाला ‘डीपीडीसी’चा हातभार लावला जाईल असेही त्यांनी स्पष्ट करताना नक्षल हल्ल्यात मरण पावलेल्या पोलीस आणि सामान्य नागरिकांच्या पाल्यांना तसेच नक्षल-पोलीस चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या पाल्यांना शाळा-महाविद्यालयांमधून शिक्षण घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेमधून विशेष निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

Leave a Comment