उपग्रहाद्वारे कार्बन डाय ऑक्साईडचा शोध

satelite
वॉशिंग्टन – वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड वायूचा शोध घेण्यासाठी अमेरिकी अंतराळ संशोधन संघटना नासा लवकरच एक उपग्रह अंतराळामध्ये सोडणार आहे.

कॅलिफोर्नियाच्या वेंडनबर्ग प्रक्षेपण तळावरून सोडला जाणारा हा उपग्रह दर सेकंदाला २४ आणि या हिशेबाने दररोज १0 लाख नोंदी पृथ्वीवर पाठवेल. अर्थात यामध्ये एक सगळ्यात मोठा अडथळा आहे. आकाश बर्फाच्छादित असल्याने ही प्रक्रिया खंडित होऊ शकते. मात्र ढग नसल्यास या उपग्रहाद्वारे दररोज किमान एक लाख फोटो डाटा प्राप्त होऊ शकतील. उत्तर कॅरोलिनाच्या अपालाशियन स्टेट युनिव्हर्सिटीतील भूगर्भ विभागाचे प्राध्यापक ग्रेग मर्लेंड यांच्या म्हणण्यानुसार, सध्या शास्त्रज्ञ जीवाश्म इंधन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होणार्‍या अन्य हालचालींचा वातावरणावर होणार्‍या परिणामाचे अध्ययन करीत आहेत. या वायूचे स्रोत आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीचा मार्ग शोधणे हे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. अँरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक केविन गर्नी यांच्या मते, हा उपग्रह जीवाश्म इंधन उत्सर्जनाचा शोध घेण्यास हातभार लावेल. अंतराळात पसरलेला कचरा हटविण्यासाठीही नासाने २00९ मध्ये एक मोहीम हाती घेतली होती. अंतराळ कचरामुक्त करण्यासाठी नवे उपग्रह पाठविण्याची गरज नाही, असे त्यात आढळून आले.

Leave a Comment