आशियात भारतात इंटरनेट स्पीड सर्वात कमी

intranet
भारतात इंटरनेटचा स्पीड आशियातील सर्वात कमी असल्याचा आश्वर्यकारक शोध अकामाई या स्टेट ऑफ इंटरनेट अहवाल सादर करणार्‍या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. भारतात इंटरनेटचा सरासरी वेग १.७ एमबीपीएस( मेगाबाईट पर सेकंड) असून तो थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम या देशांपेक्षाही कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जगातील देशात इंटरनेट वेगात भारताचा ११८ वा क्रमांक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार भारताच्या इंटरनेट स्पीडमध्ये तिमाहीला ८.४ टक्कयांनी वाढ होत असून वार्षिक वाढ २४ टक्के आहे. ग्लोबल पातळीवर इंटरनेटचा वेग ३.९ एमबीपीएस पासून २१.२ एमबीपीएस पर्यंत आहे. भारतात इंटरनेटचा सर्वाधिक वेग १२ एमबीपीएस नोंदविला गेला असून १० एमबीपीएसचा वेग ब्राडबँड सेवेचा आहे. भारतातील ०.७ टक्के युजर १० स्पीडचा वापर करतात तर ४.९ टक्के युजर ४ एमबीपीएस चा वापर करतात असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियातील इंटरनेटचा वेग हा जगात सर्वाधिक असून तो २३.६ एमबीपीएस इतका आहे. तसेच इंटरनेटवरील बहुसंख्य वेबसाईट त्यांच्या साईटसाठी निळ्या रंगाला सर्वाधिक प्राधान्य देतात असेही या निरीक्षणात दिसून आले आहे. निळा रंग शांतता आणि थंडपणाचे प्रतीक असल्याने कदाचित हा रंग सर्वाधिक वापरला जात असावा असे सांगितले जात आहे. फेसबुक, ट्वीटर, लिंकडेन, इंस्टाग्राम यांच्या वेबसाईटही निळ्या रंगाचा वापर करत आहेत. मोबाईल अॅपसाठीही हाच रंग सर्वाधिक वापरला जातो आहे.

Leave a Comment