आता दहशतवाद्यांसाठी ‘सुधारगृह’

terrorist1
इस्लामाबाद – दहशतवाद आणि पाकिस्तान हे समीकरण बनले असताना कट्टरपंथी दहशतवाद्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न महत्वपुर्ण निर्णय तेथील पंजाब सरकारने घेतला आहे. त्यासाठी 24 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा महत्वपुर्ण निर्णय देखील घेतला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी प्रतिबंध घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधीत असलेल्या इस्लामी कट्टरपंथीय दहशतवाद्यांना सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक विशेष अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. या अकादमीत १३०० नागरिकांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी खैबर पख्तूनख्वा येथील स्वात खोऱयात असलेली ‘मशाल’ नावाची शाळा पाक लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Leave a Comment