२२ हत्या ;पण ३६ वर्षांनी जेरबंद

criminal
मुंबई : महाराष्ट्रात 21 जणांची निर्घुण हत्या करणारा मारेकरी तब्बल 36 वर्षांनी बंगलोरमध्ये सापडला आहे. चंद्रकात शर्मा असे या मारेकऱ्याचं नाव आहे. बेंगलोरमध्ये 22 वी हत्या करताना तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला,सखोल तपास करताना महाराष्ट्रात २१ हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. चंद्रकांत हा 1985 पासून बंगलोरमध्ये स्थलांतरीत झाला आहे.

सन 2008 मध्ये चंद्रकांत त्याची पत्नी हर्षा आणि मुलगा मोन्टो शर्मा या तिघांनी आपल्या घरमालकाची हत्या केली होती . याप्रकरणी बंगलोर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.तुरुंगातील चौकशीदरम्यान चंद्रकांत शर्माने महाराष्ट्रातील आपल्या काळ्या कृत्यांचा पाढाच वाचला. 1978 ते 1981 या काळात जवळपास 21 खून पाडले. यानंतर 1985 मध्ये तो बंगलोरमध्ये शिफ्ट झाला. त्यानंतर अखेर महाराष्ट्र पोलिसांनी तपास बंद केला होता.मात्र चंद्रकांत बेंगलोर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. चंद्रकांतचा कबुली जबाब पडताळण्यासाठी बंगलोर पोलिसांनी महाराष्ट्रात टीम पाठवण्याचाही विचार सुरू केला आहे.मात्र चंद्रकांतच्या गुन्ह्यांच्या बहुतेक फाईल्स नष्ट झाल्याची माहिती महासंचालक अलोक कुमार यांनी दिली आहे. मात्र इतक्या हत्या केल्यानंतर का होईना तो आरोपी सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस या प्रकरणी कशाप्रकारे कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment