सराव सामन्यात पुजाराचे अर्धशतक

chetshwar-pujara
डर्बी – दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत डर्बीशायरने पहिल्या दिवशीच्या 5 बाद 326 धावसंख्येवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवशी भारताने उपाहारापर्यंत 3 बाद 98 धावा जमविल्या होत्या.

नऊ गोलंदाजांचा भारताने वापर केला. त्यात जडेजाने 27 धावांत 2 बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली तर पंकज सिंग सर्वात महागडा ठरला. त्याच्या 14 षटकांत 63 धावा निघाल्या. डर्बीशायरतर्फे स्लेटर (54), गॉडलमन (नाबाद 67), डर्स्टन (95), होसेन (नाबाद 53) यांनी अर्धशतके झळकवली. गॉडलमन व डर्स्टन यांनी पाचव्या गडय़ासाठी 124 धावांची भागीदारी केली तर गॉडलमनने होसेनसमवेत सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 87 धावांची भागीदारी केली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताने 5 बाद 222 धावा जमविल्या होत्या. पुजाराने 81 धावा जमविल्यानंतर निवृत्ती घेतली तर धोनी 46 व कोहली 36 धावा काढून बाद झाले. जडेजा 15 धावांवर खेळत होता.

Leave a Comment