राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत स्नूकर, बिलियर्डसला स्थान मिळावे

pankaj-advani
नवी दिल्ली – राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत बिलियर्ड्स व स्नूकरला आवर्जून स्थान मिळायला हवे, अशी अपेक्षा वर्ल्ड-6 रेड्स स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत अजिंक्यपद संपादन करणाऱ्या पंकज अडवाणीने व्यक्त केली. इजिप्तमधील स्पर्धा जिंकून मायदेशी परतल्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.

बिलियर्ड्स तसेच स्नूकरमध्येही भारताची मागील तीन-चार वर्षांच्या कालावधीत चांगली कामगिरी होत आहे. अर्थात, या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रेरणा लाभावी, यासाठी हे क्रीडा प्रकार राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतही समाविष्ट असायला हवेत, असे पंकज अडवाणी म्हणाला.

अर्जुन पुरस्कारप्राप्त पंकजने 2006 व 2010 आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले असून बिलियर्ड्समध्ये सात विश्व अजिंक्यपदे व स्नूकरमध्ये दोन विश्व जेतेपदे त्याच्या खात्यावर आहेत.

Leave a Comment