राजकीय वर्तुळात खळबळ; महायुती तुटणार?

sena
मुंबई – भाजप नेत्यांचा लोकसभेतील विजयानंतर आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. भाजपचे नेते मधु चव्हाण यांनी महाराष्ट्रातील विधानसभा भाजपाने स्वबळावर लढविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

स्वबळावर भाजपने निवडणुका लढल्यास महायुतीचे काय होणार असा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, मधु चव्हाण यांच्या मागणीबाबत भाजप पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुका भाजपाने स्वबळावर लढवाव्यात. तसेच विधानसभेसाठी भाजपने १४५ पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवावे अशी मागणी मधु चव्हाण यांनी केली आहे.

तीन पायांची शर्यत आता पूरे झाली असे म्हणत भाजपचा ‘बोन्साय’ करणार का? असा प्रतिप्रश्न ही मधु चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
भाजप संपूर्ण २८८ जागांची तयारी करेल. ज्या जागा आपण लढू त्यावर ही तयारी आपल्या कामी येईल, तर, इतर ठिकाणी आपल्या मित्र पक्षाच्या कामी येईल असे ट्वीट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Leave a Comment