महिला हॉकी संघाचे रितू रानीकडे नेतृत्व

ritu-rani
नवी दिल्ली – अनुभवी मिडफिल्डर रितू रानीकडे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या १६ सदस्यीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. उपकर्णधारपदी अनुभवी बचावपटू दीपिकाची निवड झाली आहे. सध्या पतियाळात महिला हॉकी संघाचे सराव शिबिर सुरू आहे.

९ जुलैला रितू रानी आणि सहकारी स्कॉटलंडला रवाना होतील. भारताचा संघ : गोलकीपर – सविता. बचावपटू – दीप ग्रेस इक्का, दीपिका (उपकर्णधार), किरणदीप कौर, नमिता टोपो, जसप्रीत कौर. मिडफिल्डर – रितू रानी (कर्णधार), सुशीला चानू, लिलिमा मिंझ, वंदना कटारिया, नवजोत कौर. फॉरवर्ड्स – रानी, पूनम रानी, रितुशा आर्या, अनुपा बार्ला, अनुराधा देवी.

Leave a Comment