नवी मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागलेले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणात 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुका होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्रासह हरियाणात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत सात डिसेंबरला संपत आहे. तर हरियाणातील विधानसभेचा कार्यकाळ 27 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये 27 ऑक्टोबरच्या आधीच निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळीआधीच दोन टप्प्यात विधानसभेच्या निव़डणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन महिन्यात अधिकृत कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी रंगण्याची शक्यता असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीही केली आहे.
जागावाटपाच्या चर्चा आघाडी असो युती यांच्यात आता होऊ लागल्या आहेत. त्यात लोकसभेत कुणाला यश जास्त मिळाले यावरूनही कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात मात्तबर राजकीय पक्षांबरोबरच अन्य पक्षही व्यूहरचना आखण्यात मग्न झाले आहेत, ज्या पक्षांनी युती केली आहे,त्यांनी वर्चस्वासाठी मोट बांधण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत.