बहामास – रोजच्या दैनदिन कामकाजात आपण सर्वच व्यवसाय असो नोकरी प्रत्येकजण विविध कर भरतात किंबहुना करप्रणालीवरच देशाचा असो राज्याचा अथवा शहरांचा कारभार चालतो मात्र त्याला बहामास हा देश अपवाद ठरला आहे,तिथे कुठलेच कर आकारले जात नसल्याने जगातील एकमेव करआकारणी विरहित देश ठरला आहे.
बहामास … कोणतेही कर नसलेला एकमेव देश !
सरकारी तिजोरीत कर जमा होत असतो. देशाचा आर्थिक डोलारा या करावर अवलंबून असल्याने प्रत्येक देशात कर वसूल केला जातो, पण जगामध्ये बहामास असाही एक देश आहे, तिथल्या लोकांना कोणत्याच प्रकारचा कर द्यावा लागत नसतो. याबाबतीत या देशातील लोक एकदम निश्चिंत असतात. कर नाही, मग देशाच्या उत्पन्नाचा स्रोत काय, असा सवाल पडणे साहजिकच आहे. तिथल्या सरकारला अन्य प्रकारे महसूल प्राप्त होतो. म्हणूनच तिथे कर नाही, असे त्याचे उत्तर आहे. कर नसलेला जगाच्या पाठीवरील बहुधा एकमेव देश. अटलांटिक महासागरात असलेला हा देश निसर्गसौंदर्याने नटलेल्या २९ बेटे मिळवून बनलेला आहे. या देशाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक भेट देण्यासाठी येत असतात. तिथे ना आयकर लागतो ना व्यवसाय कर. व्हॅट किंवा मग संपत्ती कराचीही झंझट तिथे नाही. बहामासच्या सरकारला आयातशुल्कातून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळते. याशिवाय तिथे परवाना शुल्क अतिशय जास्त आहे. मालमत्ताकर वा मुद्रांक शुल्कातूनही सरकारला मोठी कमाई होत असते. विदेशातील धनाढय़ मंडळी मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदी करण्यासाठी येत असतात. या देशाची लोकसंख्या अवघी साडेतीन लाख आहे. हा देश कधीकाळी ब्रिटिश सत्तेखाली होता आणि आता कॉमनवेल्थचा सदस्य आहे.