बंद पडलेला शेअर बाजार पुर्ववत

share
मुंबई – मुंबई शेअर बाजाराचे बंद पडलेले व्यवहार पुर्ववत झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचे सर्व व्यवहार सकाळी बंद झाले होते. मुंबई शेअर बाजारातील काही तांत्रिक बिघाडामुळे सकाळी साडे नऊ पासून बाजाराचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा व्यवहार सुरळीत सुरू होते मात्र अंदाजे ९.२७ मिनिटांनी काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे काही वेळातच बाजारातले सर्व व्यवहार बंद पडले.

बाजारात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले सुरू आहे. मात्र या बिघाडामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

मुंबई शेअर बाजाराचे व्यवहार आजपर्यंत कधीही तांत्रिक कारणाने बंद करण्यात आलेले नव्हते. मात्र यावेळी प्रथमच अशा प्रकारे बीएसईचे व्यवहार बंद पडले होते.

Leave a Comment