जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार सीबीआय

jiha
मुंबई – मुंबई पोलिसांना जिया खान मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे.

जियाच्या आई रबिया खान यांनी हा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने याबाबत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. राम गोपाल वर्माच्या नि:शब्द या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेल्या जिया खानचा मागच्या वर्षी संशयास्पद स्वरुपात मृत्यू झाला होता.

३ जून २०१३ रोजी २५ वर्षीय जिया खान जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास लावून घेतलेल्या स्थिती आढळून आली होती. जियाची आई राबिया खान यांनी जियाचा प्रेमी सूरज पंचोली आणि अभिनेता आदित्य पंचोलीचा मुलगा याला मृत्यूप्रकरणी दोषी ठरविले होते.

Leave a Comment