चीनमध्ये रोझा ठेवण्यास प्रतिबंध

roja
बिजींग – रमझानच्या पवित्र महिन्यात चीनमधील शिनजियांग प्रांतात रोझा ठेवण्यास सरकारने बंदी घातली आहे. प्रांतातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये या बंदीचे आदेश पाठवण्यात आले असून चीनमधील मुस्लीम समुदायाने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

मुस्लीम समाजाची शिनजियांग प्रांतात लोकसंख्या लक्षणीय आहे. स्थानिक सत्ताधारी सरकारला या समाजाने रोझा, प्रार्थना सभा आणि धार्मिक सभा घेतल्यामुळे समाजात विभाजनवादी मानसिकता वाढू शकते अशी भिती वाटत आहे. त्यामुळे ही बंदी घातल्याची चर्चा आहे. या आदेशाची वारंवार माहिती सरकारी वाहिन्या. रेडिओच्या माध्यमातून दिली जात आहे. रमझानमध्ये या प्रांतातील आजी – माजी सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, पक्ष कार्यकर्ते यांनी सामील होऊ नये असा संदेशही स्थानिक वाहिन्यांवर झळकत आहे. यापूर्वी स्थानिक प्रशासनाने सर्व कर्मचा-यांना सुदृढ शरीरासाठी रोझा ठेऊ नये असे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणा-या संघटना, व्यक्ती आणि समाजावर बंदी घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Comment