मुंबई – राज्याच्या सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे.
गडकरींच्या नेतृत्वात भाजप विधानसभा निवडणूक लढवणार?
भाजपची विस्तारित कार्यकारणीची पहिली बैठक गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आज अंधेरी इथल्या शहाजी राजे क्रीडा संकुल येथे होत आहे. पक्षाचे राज्याचे पदाधिकारी, खासदार, आमदार, केंद्रातले खासदार मंत्री, जिल्हा आणि तालुका स्तरीय पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा कार्यक्रम आणि तयारी यासंदर्भात ठोस कार्यक्रम दिला जाणार आहे. जिल्हा निहाय आढावा घेतल्यावर अनेक
जिल्ह्यातून स्वतंत्र लढण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेबरोबर युती नको अशी भावना अनेक पदाधिकारी यानी व्यक्त केली आहे. तेव्हा आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते
कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.