सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत ‘आरबीआय’ !

gold
नागपूर – नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेले जुने सोने नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. हे सोने स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे.

एका आर्थिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या सोन्याची क्वालिटी तितकी चांगली नाही आणि यासाठीच या सोन्याल उत्तम प्रतीच्या सोन्यात बदलले जाईल. यासाठी मोठ्या ग्राहकांना आणि आंतरराष्ट्रीय सराफा व्यापाऱ्यांना बँकेने संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. यासाठी बँकेने जाहीराती देखील दिल्या आहेत.

आपल्या नागपूर खजान्यातून सोने इथल्या बँकांना रिझर्व्ह बँक देईल, ज्या लंडनच्या बँकेतून नवे सोने घेतील. येथील बँका जुने सोने लंडनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमध्ये जमा करतील.

20.8 अरब डॉलरचे भारताजवळ रिझर्व्ह सोने आहे. हे सोने म्हणजे भारताच्या परकीय चलन साठ्याचा एक भाग आहे. भारताने 1991 मध्ये दिवाळे निघण्यापासून वाचण्यासाठी जे सोने परदेशांत गहाण टाकले होते ते पुन्हा ताब्यात घेतले आहे. पण, ते अजूनही तिथल्याच बँकेत ठेवले गेले आहे.
या अदला-बदलीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, देशातील सोन्याच्या उपलब्धतेत वाढ होईल आणि सोन्याच्या तस्करीवरही लगाम घालायला मदत होईल.

Leave a Comment