महागड्या छत्रीचा रोचक इतिहास

umbrella
बीजिंग – पावसाळा लागताच छत्री सगळ्यात मोठा आधार वाटतो. पाऊस व उन्हापासून बचाव करणारी छत्री जगात सर्वत्रच वापरली जात असली तरी तिचे उगमस्थान चीनमध्ये आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल.

चीनमध्ये पहिल्यांदा छत्री बनविण्यास सुरूवात झाली होती. एवढेच नव्हेतर जगातील सगळ्यात महागड्या छत्रीची निर्मितीही चीनमध्ये झाली आहे. हो हंग नामक व्यक्तीने बैलाचे चमडे आणि शंभर वर्षांपूर्वी जर्मनीत बनविण्यात आलेला छत्रीचा सांगाडा यांचा वापर करून त्याने दोन छत्र्या तयार केल्या होत्या. १९९४मध्ये या महागड्या छत्र्यांच्या निर्मितीबद्दल त्याचे नाव गिनीज बुकातही नोंदले गेले होते. त्यावेळी त्यांची किंमत प्रत्येक दोन हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनात त्यांच्यासाठी त्यावेळी ६४ हजार रुपये मोजावे लागले असते. आपल्या या विक्रमी छत्रीसाठी वापरलेली प्राचीन फ्रेम हो हंगला बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीनजिक सापडली होती. गिनीज बुकात नोंद झालेली ही छत्री हो हंगने नंतर हाँगकाँगमधील एका संग्रहालयाला भेटरुपात सुपूर्द केली होती. आयुष्याचे ८२ पावसाळे अनुभवलेल्या होने छत्री बनविण्याचे आपले काम १९४७मध्ये म्हणजे वयाच्या १५व्या वर्षीच सुरू केले होते. या व्यवसायात त्याला ६५ वर्षे झाली असली तरी आजही तो तेवढय़ाच सहजतेने व तत्परतेने छत्रीदुरुस्तीचे काम करतो.

Leave a Comment