मध्य अमेरिकेतील जनजीवन वादळामुळे विस्कळीत

america
वॉशिंग्टन – मध्य अमेरिकेत आलेल्या वादळाने जनजीवन विस्कळीत झाले. हजारो नागरिकांची धुळीचे वादळ, वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस यामुळे वाताहात झाली आहे. या वादळामुळे परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. इलिनॉईस शहराला या वादळामुळे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीचा फटका बसला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडेदेखील कोसळली आहेत. या परिस्थितीमुळे शेकडो विमान उड्डाणे यामुळे रद्द करण्यात आली आहेत.

परिसरात वेगाने वारे वाहत होते आणि विजादेखील चमकत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिसरातील १ लाख ५३ हजार नागरिक काल विजेशिवाय राहिल्याचे संबंधित विभागातील प्रवक्त्या किम मॉरिस जॉनसन यांनी सांगितले. राष्ट्रीय हवामान खात्यातील प्रवक्ते पॅट स्लॅटरी यांनी सांगितले की, ताशी १४५ किलोमीटर असा वार्‍यांचा वेग नोंदवण्यात आला आहे. या वादळात दोन नागरिकांचा बळी गेला आहे, असेही त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या एका १७ वर्षाच्या मुलाला शोधण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. शिकागोच्या ओहेर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २०० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर ६०० विमान उड्डाणे दिरंगाईने करण्यात आल्याची माहिती फ्लाईटवेअरने संकेतस्थळावर दिली आहे.

Leave a Comment