भारत-इंग्लंड यांच्यात पाच कसोटी होतील – पटेल

bcci
मुंबई – यापूर्वी भारत व इंग्लंड यांच्यात नेहमी तीन किंवा चार कसोटींची मालिका होत असे. बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी यापुढे पाच कसोटींची मालिका खेळण्याचा करार दोन्ही देशांच्या मंडळांनी केला असल्याचे सांगितले. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यावर पाच कसोटी खेळल्या जाणार आहेत.

पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की यापुढे देखील मायदेशात व त्यांच्या देशात अशा पाच कसोटींच्या मालिका होतील, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटींच्या मालिका खेळविण्यात येतील. पुढील आठ वर्षांच्या कालावधीत (2023 पर्यंत) दोन्ही देश आमच्याविरुद्ध एकूण चार चार मालिका खेळणार आहेत.

या मोसमात विंडीज संघ भारत दौऱयावर येणार असून या दौऱयात तीन कसोटी व पाच वनडे सामने 4 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत होतील. चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धा संपल्यानंतर ही मालिका होईल. ही स्पर्धा 14 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या अवधीत होईल.

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱयावर येणार असून त्यात तीन कसोटी व वनडे सामने होतील. त्यानंतर इंग्लंड संघ दोन भागात भारताचा दौरा करेल. ख्रिसमस ब्रेकच्या आधी हा संघ कसोटी सामने खेळेल. त्यानंतर 2016 च्या सुरुवातीस वनडे मालिका खेळेल.

Leave a Comment