फ्रान्सचे माजी राष्ट्रपती गजाआड

sarkozy
पॅरिस – फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोजी यांना भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सार्कोजी यांची तब्बल १५ तास कसून चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली, असे एका दैनिकाने प्रकाशित केले आहे.

२00७ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस सार्कोझी यांच्या विजयासाठी लिबियाचे तत्कालीन हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांनी पैसा खर्च केला होता, असा आरोप सार्कोझी यांच्यावर करण्यात येतोय. याशिवाय फ्रान्समधील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या एलह्यओरियल हैयरेस लिलियन बेट्टनकोर्ट यांच्याकडूनही त्यांनी नियमबाह्य निवडणूक निधी प्राप्त केल्याचा आरोप आहे. सार्कोझींनी हे आरोप फेटाळून लावले. मात्र, विरोधकांनी या मुद्याचे भांडवल केल्यामुळे त्यांच्या अडचणींत चांगलीच वाढ झाली आहे. सार्कोझी व त्यांचे वकील थिएरे हझरेग यांच्यातील एक दूरध्वनी संभाषण नुकतेच पोलिसांनी टॅप केले आहे. या संभाषणात सार्कोझी आपल्या वकिलांना गद्दाफी प्रकरणात आपल्या बाजूने निकाल येण्यासाठी एखाद्या न्यायाधीशाला फोडण्याच्या सूचना करत आहेत. या टेपनंतर स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दंडाधिकार्‍यांनाच लाच देऊन न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांचे वकील हर्गोझ आणि इतर दोन दंडाधिकार्‍यांना सोमवारीच ताब्यात घेतले आहे. तर सार्कोझी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत सहकार्य न केल्यास पोलीस पुढील २४ तासांसाठी त्यांच्या कोठडीत वाढ करू शकतात, असेही वृत्त आहे.

एखाद्या गुन्ह्यात चौकशीनंतर अटक करण्यात आलेले सार्कोजी हे फ्रान्सचे पहिले माजी राष्ट्रपती ठरले आहे.दरम्यान, या प्रकरणी आरोप सिद्ध झाले, तर सार्कोझींना १0 वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते

Leave a Comment