गुंतवणूकदारांसाठी बजेटपूर्वीच शेअरबाजार वधारला

share-bul
मुंबई – विदेशी निधीचा वाढलेला ओघ आणि जागतिक बाजारातील स्थिर वातावरण याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहे. यामुळेच निर्देशांकात 270 अंशाची वाढ होऊन शेअरबाजार 25786 या नव्या उच्चांकावर पोहचला.

शेअरबाजाराच्या निर्देशांकात गेल्या तीन सत्रात सातत्याने वाढ होऊन, तो 453.68 अंशावर पोहचला आहे. तसेच निफ्टीच्या निर्देशांकातही 75 अंशाची वाढ होऊन तो 7709 अंशावर पोहचला. जाणकारांच्या मते, जागतिक बाजारातील स्थिर वातावरणाचे संकेत, अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांवर भर दिला जाण्याची शक्यता यामुळेच शेअरबाजारात तेजीचे वातावरण आहे. बँकींग, तेल आणि गॅसच्या समभागांना गुंतवणूकदारांकडून चांगली मागणी आहे.

Leave a Comment